Breaking News

सततच्या दरोड्यांमुळे काश्मीरमधील बँकेच्या 40 शाखांमधील रोखीचे व्यवहार बंद

श्रीनगर, दि. 07 - सततच्या दरोड्यांमुळे आणि दहशतवादी कारवायांमुळे जम्मू आणि काश्मीर बँकेने दक्षिण काश्मीरमधील पुलवामा आणि शोपिया जिल्ह्यातील  40 शाखांमध्ये रोखीचे व्यवहार बंद केले आहेत. या शाखांच्या खातेधारकांसाठी धनादेशाद्वारे रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करण्याची आणि इंटरनेट बँकिंगच्या  सहाय्याने व्यवहार करण्याची सुविधा मात्र कायम ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जम्मू आणि काश्मीर बँकेच्या अधिका-याने दिली. या 40 बँक शाखांमध्ये  रोकडविरहित व्यवहार केले जाणार असून केलेल्या व्यवहाराची पावती देण्यात येणार आहे. या शाखांमधील खातेधारकांना नजीकच्या ‘सुरक्षित’ अशा बँक  खात्यांतून रोखीचे व्यवहार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. निश्‍चलनीकरणाच्या कालावधीपासून अज्ञात बंदूकधा-यांनी किमान 9 वेळा जम्मू आणि काश्मीर  बँकेला लक्ष्य केले असून सुमारे 50 लाखाहून अधिक रोकड लुटून नेली आहे. त्यामुळे या विभागातील सुमारे 40 शाखामंध्ये रोखीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले  आहेत.