गुरप्रीत सिंग घुग्गी यांचा आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा
चंदीगढ, दि. 11 - पंजाबमधील आम आदमी पक्षाचे नेते व मोजक गुरप्रीत सिंग घुग्गी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान घुग्गी यांना हटवून त्यांच्या जागी भगवंत मान यांना पंजाबचे नवे संयोजक करण्यात आले होते. पदावरून हटवल्यामुळे घुग्गी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पक्ष प्रतिकूल परिस्थितीत असताना मी कायम पक्षाला साथ दिली. मात्र आता पक्षच आपल्याला वेगळे करत आहे. निवडणुका झाल्यानंतर ॠआप’चे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबकडे पाठ फिरवली असल्याचा आरोपही घुग्गी यांनी पत्रकार परिषदेत केला.
