Breaking News

उपोषणाला बसलेल्या कपिल मिश्रा यांच्यावर हल्ला; एक जण ताब्यात

नवी दिल्ली, दि. 11 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे ‘आप’चे निलंबित मंत्री कपिल मिश्रा यांच्यावर आज दुपारी एका  इसमाने हल्ला केला. मिश्रा स्वत:च्या घरासमोर केजरीवाल यांच्याविरोधात बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यावेळी अंकित भारद्वाज नावाच्या इसमाने त्यांच्यावर हल्ला  केला. त्यांचे कपडे फाडले आणि त्यांना मारहाण केली. अंकित हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा संशय आहे. अंकितने हल्ला केल्यानंतर तेथे उपस्थित  लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, काल रात्रीच एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून मिश्रा यांना दूरध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि व्हॉट्सपवरही संदेश पाठवण्यात  आले होते.