Breaking News

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी ‘किंगफिशर’ मद्य प्रायोजक

दुबई, दि. 11 - चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी मद्य प्राजोयक म्हणून किंगफिशर कंपनीची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी ही  माहिती दिली. 1 ते 18 जून दरम्यान ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे होणार आहे. यातील एडग्बस्टन, ओव्हल आणि कार्डीफ या तीन ठिकाणी होणा-या  सोहळ्यांसाठी ‘किंगफिशर’कडून मद्य (बियर) पुरवले जाणार आहे. याशिवाय, या स्पर्धेसाठी आयपीएलच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या ‘फॅन पार्क’मध्येही  किंगफिशरतर्फे मद्य प्राजोजित करण्यात येणार आहे.
‘चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी किंगफिशरकडून प्रायोजकत्व मिळाल्याने परिषदेला आनंद झाला आहे. किंगफिशर हा एक मोठा ब्रँड आहे. क्रिकेट क्षेत्रातील आणि  भारतातील किंगफिशरचे यश पाहता परिषदेच्या या स्पर्धेसाठी ‘किंगफिशर’ची निवड योग्य आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे महाव्यवस्थापक कॅम्प्बेल जेमीसन  यांनी सांगितले.