तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचा ‘सुवर्ण’वेध
शांघाय, दि. 21 - तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या पुरुष कम्पाऊण्ड संघाने सुवर्णपदक पटकावले. या संघात अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीथर आणि अमनजीत सिंग या तिघांचा समावेश होता. भारतीय संघाने कोलंबियाच्या संघाला अतिशय चुरशीच्या लढतीत 226-221 अशा कमी गुणांच्या फरकाने पराभूत केले आणि विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सुवर्णपदक जिंकले. या आधी उपांत्य फेरीतदेखील या पेक्षा अधिक अटीतटीची झुंज दिली होती. अमेरिकेच्या रिओ विल्ड, स्टीव्ह अँडरसन आणि ब्रॅडन गेलेंथीयन या त्रिकुटाला भारताने केवळ 2 गुणांच्या (232-230) फरकाने नमवले होते. भारतीय महिला संघाला मात्र या स्पर्धेत हार पत्कारावी लागली.