Breaking News

बाबरी मशीद प्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

लखनौ, दि. 21 - बाबरी मशीद प्रकरणी माजी खा. राम विलास वेदांती यांच्यासह पाच जणांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. यामध्ये  विश्‍व हिंदू परिषदेचे नेते गणपत राय, वैकुंठ लाल शर्मा, महंत नृत्य गोपाल दास महाराज, धर्मदास महाराज यांचा समावेश आहे. पुढील सुनावणी वेळी भाजपचे ज्येष्ठ  नेते लालकृष्ण आडवाणी व अन्य नेते हजर राहू शकतात.
केंद्रीय अन्वेषण विभागाने पाच जणांना समन्स बजावले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधितांविरोधात गुन्हेगारी कट रचल्याचा खटला सुरू करण्यात  आला. त्यावर आज दुपारी जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. पिनाकी चंद्र घोष व न्या. रोहिंटन फली नरीमन यांच्या खंडपीठाने गुन्हेगारी कट प्रकरणाचा खटला रायबरेलीहून लखनौ न्यायालयात  हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. सदर सुनावणी दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश देत सुनावणी दरदिवशी घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते.