Breaking News

इटालियन ओपन : सानिया- श्‍वेल्डोव्हा जोडीचे आव्हान संपुष्टात

फोरो इटॅलिको, दि. 21 - इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला दुहेरी गटात भारताच्या सानिया मिर्झा आणि रशियाच्या यारोस्लाव्हा श्‍वेल्डोव्हा या तृतीय  मानांकित जोडीचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडच्या मार्टीना हिंगीस आणि तैवानच्या चॅन युंग जॅन या द्वितीय मानांकित जोडीने त्यांना 6-3,  7-6(9-7) असे पराभूत केले. पहिला सेट हिंगीस-चॅन जोडीने झटपट जिंकला. दुसरा सेट मात्र रंगतदार झाला. सानिया-श्‍वेल्डोव्हा जोडीने दुस-या सेटमध्ये  हिंगीस-चॅन जोडीला कडवी झुंज दिली. सेट टायब्रेकरपर्यंत पोहोचला. टायब्रेकरमध्येही दोन्ही जोड्या लवकर हार मानण्यास तयार नव्हत्या. अखेर हिंगीस-चॅन जोडीने  मोक्याच्या क्षणी गुण मिळवत सेट आणि सामना जिंकला आणि अंतिम फेरी गाठली. तर, सानियाच्या पराभवाबरोबरच भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले  आहे.