पाक आपल्या सर्वनाशाला निमंत्रण देत आहे - मुख्तार अब्बास नक्वी
नवी दिल्ली, दि. 03 - पाकिस्तान आपल्या सर्वनाशाला निमंत्रण देत आहे, अशी प्रखर टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या मृतदेहाची विटंबना पार्श्वभूमीवर नक्वी यांनी ही टीका केली आहे.
पाकिस्तानच्या या कृतीमुळे त्यांनी स्वत:च्या सर्वनाशाला निमंत्रण दिले आहे. पाकच्या या भ्याड कृतीला आपले जवान निश्चित चोख प्रत्युत्तर देतील, असे ते म्हणाले. जम्मू काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आणि रॉकेट हल्ल्यात दोन जवानांना हौतात्म्य आले.