‘ईव्हीएम’ मशीनमधील गैरप्रकाराची चौकशी करण्याचे राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश
पुणे, दि. 04 - महापालिका निवडणुकीत मतदानासाठी वापरलेल्या ’ईव्हीएम’ मशीनमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या तक्रारीची राष्ट्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
फेब्रुवारी 2017 मध्ये पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत मतदानासाठी वापरलेल्या ’ईव्हीएम’ मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केले होते.
या गैरप्रकाराविरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी पुणे विधान भवनासमोर उपोषण केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ईव्हीएम मशीनच्या घोळ प्रकरणी आवाज उठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रमेशन यांनी उपोषण मागे घेतले होते.
रमेशन यांनी याप्रकरणी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांच्यासह मुंबई, नागपूर, सोलापूर, अहमदनगर येथील सजग नागरिकांनीही ईव्हीएम मशीनच्या घोळाबाबत तक्रार केली होती. याबाबत राज्य निवडणूक आयोग यामध्ये आम्ही हस्तक्षेप करु शकत नाहीत, असे सांगत होते.
रमेशन यांनी याबाबत पाठपुरावा सुरुच ठेवला होता. अखेर राष्ट्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून राज्य निवडणूक आयोगाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आता राज्य निवडणूक आयोग कशा पद्धतीने चौकशी करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.