2019 च्या लोकसभा निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखाली लढवण्यास उद्धव ठाकरेंचा नकार
मुंबई, दि, 04 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2019 च्या लोकसभा निवडणुका लढवणे शिवसेनेला मंजूर नाही, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केले. बुधवारी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुका लढवेल, असा प्रस्ताव नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्वानुमते संमत झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री व लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी दिली होती . या बैठकीला उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. एप्रिल महिन्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांसाठी पंतप्रधान मोदी यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्या वेळी सर्वानुमते मंजूर केलेल्या या प्रस्तावाला आता शिवसेनेने अचानक विरोध दर्शवला.
2019 च्या निवडणुकरधान मोदींच्या नेतृत्वात लढवण्याबाबत पासवान यांनी जबरदस्तीने ठराव मंजूर करवून घेतला . पण एवढी घाई काय आहे. आज जनतेचे जे समर्थन मिळाले आहे ते देशाच्या कामी आले पाहिजे. तसेही निवडणुकीला दोन वर्षे बाकी आहेत. आपले नेतृत्व ठरवण्यासाठी एवढी घाई कशाला, असा प्रश्न विचारत हा निर्णय शिवसेनेला कदापी मंजूर नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीआधी ॠचाय पे चर्चा’ आणि निवडणुकीनंतर ॠगाय पे चर्चा’ केली जात आहे. देश वाचला तर गायच काय आपल्या सर्वांचेच रक्षण होईल. आज भाजपला जनता निवडून देत आहे. पण भाजपने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर शेतकरी पेटून उठेल, असेही ठाकरे म्हणाले.