बनावट सही प्रकरणी जबाबदार कर्मचार्यांना निलंबित करणार
पुणे, दि. 04 - पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयांतर्गत असणार्या पाच कर्मचार्यांनी मंत्रालयातील निलंबित कारकुनाला हाताशी धरून बदल्यासाठी केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बनावट सही शिक्का व लेटरहेड प्रकरणात त्या पाच कर्मचार्यांनी निलंबित करण्याची प्रक्रिया जमाबंदी आयुक्त चोक्कलिंगम यांनी सुरु केलेली आहे .
मुख्यमंत्र्यांचा बनावट सही, शिक्का वापरून बदल्यांचे आदेश काढण्याप्रकरणी जबाबदार कर्मचार्यांना बडतर्फ करावे या मागणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या पुणे शहर शाखेच्या वतीने शहराध्यक्ष अश्विन दोडके यांच्या नेतृत्वाखाली जमाबंदी आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.
यावेळी जमाबंदी आयुक्त चोक्कलिंगम यांनी शिष्टमंडळाला संबंधित कर्मचार्यांना निलान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही दिली.
याबाबत झालेल्या चर्चेत पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून सुरु असेलेल्या तपासातील वस्तुस्थिती पुढे येईपर्यंत जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत संबधित प्रकरणातील बदलीसाठी आग्रह धरणार्या पाच कर्मचार्यांना या अनुषंगाने ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्याबाबतचा आदेश पारित करण्यात येत असल्याचे स्पष्ट आश्वासन चोक्कलिंगम यांनी दिले.
दरम्यान सदर प्रकरणी संबधित कर्मचार्यांना गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्यावर अटकेची कार्यवाही करून त्यांना शासन सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे यासाठी आपले आंदोलन मंत्रालय पातळीवर सुरु ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.