Breaking News

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर पिठ फेको आंदोलनाने कार्यालय दणाणले!

नेवासा, दि. 06 - नगर-औरंगाबाद महामार्गापासून बेग वस्ती पर्यंत डांबरीकरण करण्यासाठी सुरु आसलेले काम अचानक बंद पाडण्यात आले आसल्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर काम बंद पडण्यात आल्याने नेवासाफाटा येथील सुमारे शंभर महिला एकञ येवून सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अंगावर अनोखे पिठ फेको आंदोलन करुन रणरागिनींनी आपला रौद्र आवतार दाखविल्यामुळे अधिकार्‍यांना पळताभूई थोडी करण्याचा अजब प्रकार शुक्रवारी सकाळी 11 वाजता करण्यात आला.
याबाबत अधिक सविस्तर माहीती अशी की,नेवासाफाटा येथील नगरऔरंगाबाद महामार्गापासून बेगवस्ती पर्यंतचे स्त्याचे काम सुरु आसतांना राजकिय आकासापोटी अचानक बंद पाडले.पावसाळा तोंडावर आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याला या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी सुमारे दहा दिवसांपुर्वी लेखी निवेदन देण्यात आलेले होते.माञ बांधकाम खात्याने दखल न घेतल्यामुळे नेवासाफाटा येथील सुमारे शंभर महिला एकञ येत त्यांनी शुक्रवारी रस्त्याचे काम का बंद पाडले याचा जाब अधिकार्‍यांना विचारला आसता अधिकारी गोंधळून गेले.योग्य उत्तर अधिकार्‍यांकडून देण्यात न आल्याने महिलांनी अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचा ताबा घेत उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अंगावर पिठ फेको आंदोलन केले.या महिलांचा रौद्र आवतार पाहता अधिकार्‍यांची पळताभूई थोडी झाली.
या आंदोलनाचे नेत्तृत्व रजनी भारती,सुनिता गायकवाड यांनी केले.आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या निधीतील हा रस्ता आसून सुरु आसलेले काम अचानक बंद पाडण्यात आलेले आसून पावसाळ्याच्या तोंडावर काम बंद केल्यामुळे 1 जुन पासून रस्त्यावर डांबर काम करता येत नसल्याने काम न करताच बिले काढण्याचा कुटीलडाव सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारांचा आसून समस्या कायम ठेवून शासनाच्या निधीची वाट लावण्याची व्युहरचना यामागे आसल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी केला.रस्त्याचे काम सुरु न केल्यास पुढील आंदोलन खुर्ची तोडो करण्याचा इशाराही यावेळी रणरागिनींनी दिला.