दापोरा बंधारा पाण्याने पूर्ण भरल्याने नागरिकांमध्ये उत्साह
जळगाव, दि. 09 - जिल्ह्यातील दापोरा ता.जि.जळगाव दि.6 दापोरा बंधा-यापर्यंत पाण्याचे आवर्तन काल पोहचले होते आज दुपारी 4 वाजता बंधारा पूर्ण भरून वाहत आहे. बंधा-यापर्यंत पाणी आल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे. परिसरातील ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधीं प्रशासनाकडे पाण्याच्या आवर्तन दहिगाव बंधार्या पासून खालील गावापर्यंत पाण्याची मागणी होती. दापोरा बंधार्यावर दापोरा, दापोरी, शिरसोली प्र.न, शिरसोली प्र.बो, रवंजा खुरवंजा बुखर्ची, रिगणगाव आदी गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना लाभ होईल व गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. परिसरातील नागरिकांनी दापोरा बंधार्यापर्यंत पाणी आल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानले आहेत.
