सौर उर्जा ही काळाची गरज असल्याचे महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 09 - तास सुर्यदेव आपणास सुर्य प्रकाश देत असतो. यापासुन सुमारे 5000 खरब युनिटची वीज निर्मीती होवु शकते. पारंपारीक ऊर्जा स्त्रोतांपासुन वीज निर्मिती करणे भविष्यात परवडणारे नसुन ग्लोबल वार्मींगचे धोके विचारात घेता सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता आनंद राठोड यांनी केले.
कोपरगांव मधिल रहिवासी प्रा. आनंद बारबिंड यांच्या घरी सौर ऊर्जेवर आधारीत पहिली नेट मिटरींग प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ व प्रा. बारबिंड यांच्यातील परस्पर समझोता करार होवुन कराराची कागदपत्रे परस्परांना आदान प्रदान करण्यात आली. याप्रसंगी राठोड बोलत होते. यावेळी प्रा. बारबिंड, सौर गुरू ग्रीन एनर्जी सोल्युशन्स कंपनीच्या प्रोजेक्ट डेव्हलपर मनीषा बारबिंड,वीज वितरण कंपनीचे अभियंते गणेश चौधरी,एस.एस. कडाले,पी.डी.बाविसकर,एम.ए. आभाळे,पी.डी. जाधव आदी उपस्थित होते.यावेळी सोलर सिस्टीमच्या प्रोजेक्ट डेव्हलपर सौ.बारबिंड यांनी उपस्थितांचे स्वागत करून सांगीतले की त्यांनी प्रा. बारबिंड यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल पासुन 1 किलोवॅट क्षमतेचा संच उभारला.सोलर पॅनल पासुन वीज इनव्हर्टरला देवुन ए.सी. वीज निर्माण करून तिचा घरातील उपकरणांसाठी वापर केला आहे.तयार होणार्या संपुर्ण वीजेची घरात गरज नसेल तर ती नेट मिटरींगच्या द्वारे महावितरणच्या विद्युत वाहकांना देवुन विकता येते. तसेच सौर उर्जेपासुन तयार होणारी वीज अपुरी पडत असल्यास महावितरणाकडूनही वीज विकत घेता येवु शकते.तसेच रात्रीच्या वेळी संपुर्ण वीज महावितरणाकडून घेता येते. या संचाचे आयुष्य 25 वर्षांचे असुन साडे तीन ते सहा वर्षात संपुर्ण संच उभारणी खर्च वसुल होवुन पुढील कित्येक वर्षे मोफत वीज वापरता येते,असे सौ.बारबिंड यांनी सांगितले.
राठोड पुढे म्हणाले की, औष्णिक वीज केंद्रातुन एक युनिट वीज निर्मितीसाठी कोळशापासून एक किलो कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जीत होतो. एका कुटूंबासाठी एका वर्षासाठी सर्वसाधारण 1500 युनिटस्ची गरज असते. म्हणजे एवढी वीज जर औष्णिक वीज केंद्राकडून जर घेतली तर एक कुटूंब 1500 किलो कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जीत करते असा अर्थ होतो. एवढ्या वायुच्या मोबादल्याच्या बदलात ऑक्सिजन निर्मितीसाठी 68 वृक्षांची गरज असतेे.म्हणजे वीजेसाठी सौर उर्जेचा वापर केल्यास एका कुटूंबाने 68 वृक्षांची लागवड करून संगोपन केल्या सारखे आहे.सौर उर्जेचा वीज निर्मितीसाठी जास्तीत जास्त वापर करण्यासाठी वीज वितरण कंपनी व सौर गुरू ग्रीन एनर्जी सोलुशन्सद्वारे सरकारच्या योजनांचा फायदा देण्याचा प्रयत्न व मार्गदर्शन केल्या जाईल, असे राठोड यांनी शेवटी सांगीतले.प्रा.बारबिंड यांनी आभार मानले.