‘पाणी’ परमेश्वराने मानवाला दिलेली सर्वात अनमोल देणं - मुबीन शेख
अहमदनगर, दि. 04 - भुमीचा 70 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. तरी सुद्धा पाण्यासाठी जगात मोठ्या प्रमाणात वणवण सुरु असते. कोठे भरपुर ते कोठे पाण्याची कमतरता आहे. हे सर्व निसर्गाशी केलेल्या छेडछाडीमुळे होत आहे, हे सिद्ध झाले आहे. तरी मानव हा सुधरतांना दिसत नाही. पाण्याची भरपूर नासाडी करतो. जिथे नाही तिथेही पिण्याच्या पाण्याचा वापर करत आहे, आज खेड्यापाड्यातमध्ये पिण्याच्या पाण्याची अवस्था फार वाईट आहे. हे पाण्याची नासाडी करणार्यांना समजले पाहिजे; त्यांचे प्रबोधन करुन त्यांना यापासून रोखले पाहिजे. पिण्याच्या पाण्याची महत्व काय आहे हे ज्यांना दोन ते पाच किलो मीटरने पाणी भरावे लागते. त्यांना नक्कीच कळते की, ‘पाणी’ परमेश्वरांनी मानवाला दिलेली सर्वात अनमोल देन आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मुबीन शेख यांनी केले.
सध्याच्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता अहमदनगर सोशल क्लबच्यावतीने रामचंद्र खुंट येथे पाणपोईची उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते मुबीन शेख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मखदुम सोसायटीचे इंजि.अनिस शेख, राजूभाई शेख, मेजर रफिक, रुग्णमित्र नादीर खान, क्लबचे अध्यक्ष नईम सरदार, फातेमा फांडेशनचे अध्यक्ष सय्यद शरिफ, शफाकत सय्यद, जावेद मास्टर, अजहर मखसुसी (हैद्राबाद), इंजि.इम्रान खान, सय्यद अमीर आदि मान्यवर उपस्थित होते.
मुबीन शेख पुढे म्हणाले की, आज आपल्या देशात पिण्याचीच नाही तर वापरासाठी व शेतीसाठी पाण्याची फार कमरता आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे समतोल बिघडत चालले आहे, पाऊस कधी कमी तर कधी गरजेपेक्षा जास्त पडतो, नाही पाहिजे त्यावेळी पाऊस पडतो. यासर्व बाबी मानवाने शहरीकरणासाठी वृक्षतोड व नैसर्गिक बाबींशी केलेल्या छेडछाडीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे होतो म्हणून प्रत्येकांनी मोठ्या प्रमाणात झाडे लावायला हवी, पाणी वाचवायला हवा, पाऊसाचे पाण्याला अडवून साठवणूक केली पाहिजे, जेणे करुन येणार्या काळात मग पाण्याची कमतरता भासणार नाही. तसेच पालकांनी घरात मुलांना पाण्याचे महत्व सांगितले पाहिजे. त्यांना पाण्यासाठीची गाव खेड्यातील परिस्थितीशी अवगत करावे, किंवा एखाद्या गावाला उन्हाळ्यात मुलांना फिरण्यासाठी घेऊन जावे तर त्यांना समक्ष बघून परिस्थितीचा गांभीर्य कळेल, असे नमूद केले.