भारताचे चोख प्रत्युत्तर, 10 पाकिस्तानी जवान ठार
नवी दिल्ली, दि. 03 - पाकिस्तानने काल केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. काल रात्री भारतीय जवानांच्या तुकडीने पाकच्या दोन चौक्यांवर हल्ला केला असून त्यात पाकच्या 10 सैनिकांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानचे तीन चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. .भारतीय जवानांनी कृष्णा घाटीजवळील किरपान आणि पिंपल या दोन चौक्यांना लक्ष्य करत पाकच्या 7 सैनिकांना ठार केले आहे. पाकिस्तानचे ठार झालेले 10 जवान 647 मुजाहिद्दीन या तुकडीचे होते.पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. यावेळी पाकिस्तान सैन्याने भारतीय लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांचा शिरच्छेद केला.
