भाजपाच्या वतीने सातार्यात स्वखर्चाने पाणी पुरवठा
सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) : भाजपाच्या वतीने सातारा शहरात विविध ठिकाणी स्वखर्चाने पाणी पुरवठा करण्यात आला.
सातारा शहरामध्ये बहुतांश भागामध्ये गेली दोन ते तीन दिवस पाणी पुरवठा झाला नसल्यामुळे सातारकर नागरिक हैराण झाले होते. अशात नागरिकांनी आपआपल्या प्रभागातील नगरसेवकांना फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतू काही नगरसेवकांचे फोन बंद तर काही नगरसेवकांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. अशामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी भाजपा शहराध्यक्ष सुनील काळेकर यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने भाजपा शहराध्यक्ष सुनील काळेकर यांनी प्रभाग क्र. 7, 8 व प्रभाग क्र. 1 च्या नागरिकांशी संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. तेथूनच सुनील काळेकर यांनी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाशी फोनवरून संपर्क साधला व टँकरची मागणी केली. परंतू नगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून टँकर दुरूस्तीसाठी गॅरेजला लावला आहे असे उत्तर दिले. यानंतर काळेकर यांनी पाणी पुरवठा सभापतींना फोनवरून संपर्क साधला असता सभापतींचा फोन बंद लागल्याने शेवटचा पर्याय म्हणून मुख्याधिकार्यांना फोन लावला यावर मुख्याधिकार्यांनी आपण 15 दिवस रजेवर असल्याचे सांगितले. यानंतर मात्र शहराध्यक्ष सुनील काळेकर यांनी प्रभागांमध्ये स्वखर्चाने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेवून नागरिकांना पाणी पुरवठा केला.