नागपूरमध्ये मुलांवर भीक मागण्यासाठी दबाव टाकणारी टोळी अटकेत
नागपूर, दि. 04 - लहान मुलांवर दबाव टाकून जबरदस्ती त्यांना भीक मागायला लावणा-या टोळीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. यात 3 महिलांचा समावेश आहे. तर 4 पुरूष फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. या टोळीकडून 8 अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. या 8 जणांमध्ये सात मुली आहेत. ‘जर आम्ही दरोरज 500 रुपये भीक मागवून कमावले नाहीत तर आम्हाला मारहाण केली जात होती. पैसे कमावले तरच आम्हाला जेवण मिळत होते’, असे या सुटका करण्यात आलेल्या मुलांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा जिल्हा बाल संरक्षण समितीने या भागात तपास सुरू केला. या तपासादरम्यान ही टोळीकडून अल्पवयीन मुलांना मारहाण होत असल्याचे स्पष्ट झाले.
