माझ्या पराभवाला रशिया, अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेची भूमिका जबाबदार - हिलरी
न्यूयॉर्क, दि. 04 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीदरम्यान आलेल्या अपयशाला रशियाचा हस्तक्षेप व अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेची संशयास्पद भूमिका जबाबदार असल्याचे डेमॉक्राटिक पक्षाच्या हिलरी क्लिटंन यांनी आज सांगितले . न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे संचालक जिम कॉमे आणि रशियाच्या विकिलीक्स मेलपूर्वी आपण विजयाच्या समिप होतो. मात्र 28 ऑक्टोबर रोजीच्या कॉमे यांच्या पत्रामुळे जनतेची दिशाभूल झाली. जे लोक मला मतदान करणार होते. त्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल या लोकांनी संशय निर्माण केला, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे 28 ऑक्टोबर पूर्वी मतदान झाले असते, तर मी नक्कीच राष्ट्राध्यक्ष झाले असते.
याशिवाय वैयक्तिक इ-मेल्स हॅकिंगमागील रशियाची भूमिका आणि विकिलिक्सने प्रकरणे सादर करण्यासाठी साधलेली वेळ याबाबतही त्या बोलल्या.