अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ आत्मघातकी हल्ला, 8 ठार
काबूल, दि. 04 - अफगाणिस्तानमधील काबूल येथील अमेरिकेच्या दुतावास आणि नाटो परिसरण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 8जण ठार तर 22 जण जखमी झाले आहेत. अफगाणच्या, नाटोच्या केंद्रामध्ये सामान नेणा-या गाडीवर लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या हल्ल्यात विदेशी जवान ठार झाले की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसून प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार घटनास्थळी स्फोट होऊन सर्वत्र रक्त सांडले होते. हा हल्ला तालिबान या दहशतवादी संघटनेने केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.