तोंडी तलाकच्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी होणार - सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली, दि. 12 - तोंडी तलाकवरील सुनावणीची प्रक्रिया बहुपत्नीत्वाच्या मुद्यावर नाही, तर घटनात्मक वैधतेवर होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. तोंडी तलाकवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक सुनावणी सुरू झाली.
तोंडी तलाक हा मुस्लीम समाजाला धर्माने दिलेला मूलभूत अधिकार आहे का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. तोंडी तलाक हा धर्माने दिलेला मूलभूत अधिकार असल्याचा निष्कर्ष काढला तर त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. तोंडी तलाक हे धर्माशी संबंधित आहे का आणि मूलभूत अधिकारांतर्गत लागू करायचे की नाही, याबाबत आम्ही निर्णय घेऊ, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात सहा दिवसांची सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. त्यातील तीन दिवस तोंडी तलाकला आव्हान देणा-यांची व तीन दिवस तोंडी तलाकसंदर्भात याचिका करणा-यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे.
या प्रकरणात मुख्य याचिका क्वेस्ट फॉर इक्वॅलिटी विरुद्ध जमियत उलेमा-ए-हिंद ही आहे. सोबत खुरान सुन्नत सोसायटी, शायरा बानो, आफ्रीन रेहमान, गुलशन परवीन, इशरत जहान आणि अतिया साबरी यांनीही याचिका दाखल केल्या आहेत.