नैतिक अधिष्ठानासाठी संस्कार शिबिरांची आवश्यकता - हभप ताकोते महाराज
वीस दिवसीय संत गजानन महाराज सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरास थाटात प्रारंभ
बुलडाणा, दि. 06 - लहान मुले ही जसे घडविले तशीच घडत असतात. मुलांना लहानपणापासूनच नैतिक अधिष्ठानाचे पाठबळ मिळून मुले ही भविष्यात नैतिक आचरण करणारी सुसंस्कारी नागरिक घडो यासाठीच संस्कार शिबिरांची आवश्यकता असते असे भावोद्गार हभप प्रशांत महाराज ताकोते यांनी काढलेत.संत ज्ञानोबा तुकाराम बहुद्देशीय सेवा समितीच्या वतीने जुन्या शहरातील मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयात बुधवारी वीस दिवसीय बालसंस्कार शिबिरास प्रारंभ करण्यात आला. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी हभप ताकोते महाराज उपस्थित बालकांना मार्गदर्शन करीत होते.या उदघाटणीय सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर वैशाली शेळके, नगरसेवक मंजुषा शेळके, सतीश ढगे, सौ.चारुशीला ढगे, माजी नगरसेवक योगेश गोतमारे, सौ.मंगला म्हैसने, विलास शेळके, हभप शिवाजी महाराज मानकर, हरिभाऊ दांदळे, जगन्नाथ कराळे, सुभाष म्हैसने, प्रशिक्षक सुभाष ढोले, डॉ.सतीश उटांगळे, गजानन धरमकर, पुरुषोत्तम वैराळे, प्रशांत पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
दीप प्रज्वलन व टाळ, मृदूंग, वीणा यांच्या पूजन व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. पाहिल्यास दिनी शहरी व ग्रामीण भागातून तब्बल एकशे ऐंशी बालकांनी या शिबिरास आपली उपस्थिती दर्शविली. या वीस दिवसीय संस्कार शिबिरात बालकांना नैतिक आचरण, दोनशे संस्कृत श्लोक, मृदूंग, टाळ, वीणा वादन, गायन, प्राणायाम व योगासन आदी संस्कार वारकरी संप्रदायातील तज्ज्ञ शिक्षकाकडून शिकविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.कार्यक्रमात जगन्नाथ कराळे,मंजुशा शेळके, ढगे ,उपमहापौर शेळके, म्हैसने आदींनी या संस्कार शिबिराची उपयुक्तता विशद करून पालकांनी आपल्या लहानग्या बालकांना या संस्कार शिबिरात सहभागी करण्याचे आहवान यावेळी करून उमरी येथून प्रथमच जुने शहरात होत असलेल्या या शिबिराचे कौतुक केले.
या वीस दिवसीय शिबिरात हभप ताकोते महाराज यांच्या नियंत्रणात भागवताचार्य शिवाजी महाराज मानकर, कृष्णा महाराज घोडके, हभप शरद महाराज पाटील, हभप गोपाळ महाराज ताथोड, निवृत्ती महाराज मानकर, हभप दिलीप महाराज खोबऱखेडे, सुभाष ढोले, डॉ.सुभाष लव्हाळे, गजानन धरमकर, शिवाजी चौहान आदी तज्ज्ञ मुलांना संस्कारांचे प्रशिक्षण देणार आहेत. तर व्यवस्थापन मोहन ताथोड, रवींद्र आखरे, श्रीकांत दिवनाले, सूचित भटकर व महिला वर्ग करीत आहे.
संचालन सुनील कराळे गुरुजी यांनी तर आभार शिबिराचे मुख्याध्यापक हभप शिवाजी महाराज मानकर यांनी केले.यावेळी महादेव कोरडे, प्रशांत पाटील, सुभाष पारस्कर, दिलीप लेंडे, प्रकाश टेकाडे, आर एस ठाकरे, अरुण पिंगळे, डॉ.सुभाष लव्हाळे, हिम्मत पोहरे, शामसुंदर चोरे, वसंत मानकर, पंजाबराव वाघ, सौ.शालिनी दडगळ, रोहिणी साकरकर, छाया कुलकर्णी, अलका सावळे, राजश्री तायडे, सोनाली मेटांगे, छाया वानखडे, इंदुमती दांदळे,प्रमिला दांदळे, कल्पना वाघ, गीता इंगळे, दीपाली निंबेकर समवेत बालक व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.