सातारारोडच्या ग्रामसभेत वसना नदीतील वाळू लिलावास विरोध
सातारारोड, दि. 4 (प्रतिनिधी) : येथील वसना नदीतील वाळूउपसा केल्यास नदीपात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडतात. सातारारोड व पाडळी यांना जोडणारा नदीतून मधला जवळचा मार्ग असून या मार्गावरून शाळकरी मुले, महिला व ग्रामस्थ रोज ये जा करत असल्याने वसना नदीतील वाळू उपसा केल्यास अपघात होतात. त्यामुळे वाळूचे लिलाव करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. वसना नदीतील वाळूचे लिलाव होऊ नयेत, असा ठराव सातारारोड-पाडळी येथील ग्रामसभेत बहुमताने ठराव करण्यात आला.
सातारारोड-पाडळी स्टेशन, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायतीचे सभागृहात महाराष्ट्र दिनी झालेल्या ग्रामसभेत अनेक महत्त्वाचे ठराव करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच निलंगा अमर फाळके होत्या. यावेळी उपसरपंच तानाजीराव फाळके, सर्व सदस्य, प्रदीप फाळके, विलास कृ. फाळके, बाळासाहेब फाळके, संजय फाळके, डॉ. संजय आवडे, ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेच्या प्रारंभी सन 2016/17 चे ग्रामपंचायतीच्या वार्षिक जमा-खर्चाचे वाचन ग्रामविकास अधिकारी डी. एल. सुरवसे यांनी केले. त्यास ग्रामसभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली. गायरान सर्व्हे नं. 447 मधील जागेच्या परवानगीबाबत व कामाबाबत सभेत चर्चा करण्यात आली. गायरान मधील 5 गुंठे क्षेत्र तालमीसाठी देण्याच्या परवानगीचा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याचे ठरले. शासनाने शेतकर्यांची कर्जमाफी व वीज बिलमाफी करावी, अशा मागणीचा ठराव करण्यात आला. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव देण्याचा ठराव करण्यात आला. बाजारपेठेतील आठवडा बाजार हलवून भक्तवडी रस्त्यावर हलवण्याची चर्चा झाली. परंतू ह्या ठिकाणी सुविधा नसल्याने बाजार आहे त्याठिकाणीच ठेवण्यात यावा, असा ठराव झाला.
पाणी फौंडेशन अंतर्गत मिळालेले 5 लाख अनुदान व त्यातील कामे व झालेल्या खर्चाबाबत सभेत चर्चा करण्यात आली. उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहीमेसाठी पात्र यंत्रऔजारांची माहिती कृषी सहाय्यक फडतरे यांनी दिली. गावठाण हद्दवाढीत वैभव सोसायटी, बेघरवस्ती, स्टेशन परिसरात घेण्याचा ठराव करण्यात आला. वृक्षलागवड अंतर्गत 10 हजार सीताफळांची लागवड पालानटेकडी येथे करण्याचे ठरले. माझी कन्या भाग्यश्री योजना अनुदान योजनेची माहिती देण्यात आली. वसना नदीवरील बंधार्याचे मध्यावर एक लोखंडी चक्री दरवाजा बसवण्याचा ठराव पारीत करण्यात आला.