रस्ते हस्तांतरणावरून सांगली महापालिकेत सत्ताधारी - विरोधकांत खडाजंगी
सांगली, दि. 22 - रस्ते हस्तांतरण विषयावरून सांगली महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी व विरोधकात जोरदार खडाजंगी झाली. या विषयावरून काँग्रेसअंतर्गत काही असंतुष्ट सदस्य व विरोधी स्वाभिमानी विकास आघाडीचे सदस्य महापालिकेची पर्यायाने सांगलीकरांची नाहक बदनामी करीत असल्याचा आरोप करीत सत्ताधारी काँग्रेस सदस्यांनी महासभा तहकूब करण्याची मागणी केली, तर काँग्रेसअंतर्गत उपमहापौर गट व स्वाभिमानी विकास आघाडीने रस्ते हस्तांतरण ठरावाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची जोरदार मागणी केली. या विषयावरील संशयकल्लोळात अखेर महापौर हारूण शिकलगार यांनी ही महासभा दि. 23 मे पर्यंत तहकूब केली.
दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतरण या विषयावर सध्या महापालिकेत जोरदार राजकीय वादंग सुरू आहे. या रस्ते हस्तांतरणासाठी काँग्रेसमधील काही सदस्य प्रयत्नशील असल्याचा आरोप करीत काँग्रेसतर्ंगत उपमहापौर गट व स्वाभिमानी विकास आघाडीने गत आठवड्यापासून तीव्र आंदोलन उभारले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेली महासभा चांगलीच गाजली.
ही महासभा सुरू होण्याआधी या दोन्हीही गटांनी सुमारे 500 हून नागरिकांसमवेत महापालिकेवर बांगड्या व पायताण हातात घेऊन धडक मोर्चा काढला. या मोर्चाचे महापालिका महासभेत जोरदार पडसाद उमटले. या महासभेच्या सुरूवातीस स्वाभिमानी विकास आघाडीचे युवा नेते नगरसेवक गौतम पवार यांनी रस्ते हस्तांतरणाबाबत हारूण शिकलगार यांनी सत्ताधारी गटाची भूमिका स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी केली. त्याला उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने यांनी समर्थन देत रस्ते हस्तांतरणाचा विषय पत्रिकेवर आहे का, याचा खुलासा करून उत्तर मिळेपर्यंत ही महासभा सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेला उपमहापौर गट व स्वाभिमानी विकास आघाडीच्या सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिला.
हारूण शिकलगार यांनी आजच्या महासभेत असा कोणताही विषय घेण्यात आला नसल्याचा खुलासा केला. त्यावर गौतम पवार यांनी आजच्याच नव्हे, तर यापुढील कोणत्याही महासभेत तशा आशयाचा ठराव करणार नसल्याचे जाहीर करण्याची मागणी केली. या चर्चेत काँग्रेसचे नेते माजी महापौर विवेक कांबळे यांनी रस्ते हस्तांतरणाबाबत कोणताही विषय नसताना केवळ प्रसिध्दीपोटी काही संतुष्ट नगरसेवकांची ही राजकीय स्टंटबाजी सुरू आहे. नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी आहेत, त्याला पायताण दाखविणे म्हणजे त्या जनतेचा अपमान आहे. त्यामुळे नागरिकांना भडकाविणार्या संबंधित नगरसेवकांना बेड्या ठोका, अशी मागणी केली. वास्तविक, रस्ते हस्तांतरणाचा ठराव करण्यासाठी उपमहापौर गट व स्वाभिमानी विकास आघाडीच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येकी पाच लाख रूपये, तर नेत्यांना प्रत्येकी 20 लाख रूपये द्यावेत, अशी मागणी झाल्याचा आरोप विवेक कांबळे यांनी केला.
या आरोपामुळे या वादात अधिकच भर पडली व अचानकपणे प्रकरण हातघाईवर आले. हे पाहताच उपमहापौर विजय घाडगे यांनी तात्काळ व्यासपीठ सोडले. या आरोपावरून विवेक कांबळे यांच्यासमवेत गौतम पवार व शेखर माने यांची चांगलीच शाब्दिक लढाई जुंपली. एकमेकांना जशास तसे उत्तर देण्याचाही इशारा झाला. यात दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी आपापल्या सदस्यांची समजूत काढली. या गोंधळातच काँग्रेस सदस्यांनी या राजकीय स्टंटबाजीमुळे महापालिकेची बदनामी झाली असून याचा निषेध म्हणून आजची महासभाच तहकूब करावी, अशी मागणी केली. त्यानंतर पुन्हा गौतम पवार व शेखर माने बोलण्यास उठले असता गोंधळास सुरूवात झाली. अखेर हारूण शिकलगार यांनी ही महासभा दि. 23 मे पर्यंत तहकूब करण्यात आल्याचे जाहीर केले.