पिंपळदरावाडीत उन्हाळी बालसंस्कार शिबीर उत्साहात
अकोले, दि. 05 - चार भिंतीच्या आत पुस्तकी पाठ अभ्यासण्यापेक्षा, निसर्ग सानिध्यात मुक्तपणे जीवन कौशल्याचे व मुल्याचे धडे घेण्यात खरा आंनद व मुल्य विकास असतो. याची प्रचिती, आदिवासी क्षेत्रातील पिंपळदरावाडी (दगडवाडी) शाळेत आयोजित उन्हाळी सत्रातील बालसंस्कार शिबिरातून आली.
शाळेतील शिक्षक संतोष सदगीर व लता जगधने यांनी शिबीराचे आयोजन 14 एप्रिल ते 1 मे या कालावधीत केले होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीने प्रारंभ होऊन, महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाने सांगता झाली. या 15 दिवसांच्या सुट्टीच्या काळात मुलांनी आगळ्या वेगळ्या जीवन कौशल्यांचा अभ्यास आंनदात केला. पटावरील सर्व 56 विद्यार्थी वेळेत रोज हजर असायचे.
या शिबीरात सकाळी प्रभा भास्कराची प्रार्थनेने मंगल सुरवात होत असे. परिपाठ, बोधकथा, सामान्य ज्ञान, अंभग, संत वचन, योगासने, व्यायाम, असे प्रकार घेतले. यानंतर चित्र काढून रंग भरणे, पेटी, ढोल, ताशा, विजविणे, सोबतीला कविता, लावणी, गितांचे गायन व विविध नृत्य प्रकार यात मुले रमून गेली. नंतर झाडांना पाणी देऊन, आळे करणे, कुंपण करण्याची कामे केली.
अल्पोपहार झाल्यावर क्षेत्र भेटीत, शेतीवाडीला भेट,शेतीतील पिके, कामे, शेतकरी संवाद. सुतार नेटावर जाऊन कारागीर संवाद, गवंडी कामास भेट देऊन त्यांची मुलाखत घेणे, शालेय परिसरात मध संकलन करणे, मधमाश्यांचा अभ्यास करणे, औषधी वनस्पतींची ओळख व माहिती घेणे हा आंनदायी उपक्रम घेण्यात आला.
या ग्रामीण कलाकार मुलांच्या भेटीस आणने, यामध्ये ग्रामीण कलाकार नामदेव आगविले, राजू तळपाडे यांनी तमाशा, भारुड, जागरण गोंधळ व ग्रामीण गित यांचे धडे दिले. शेवटी एलसीडी प्रोजेक्टर व टॅब हाताळण्यास देऊन आंनद बौध्दीक विकास साधला.
यामुळे विद्यार्थीना यथेच्छ आंनद व खरे जीवन कौशल्य व मुल्यांचा विकास झाला. हे बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी परशुराम पावसे, विस्तार अधिकारी जालिदंर खताळ व केंद्र प्रमुख औताडे यांचे मार्गदर्शन लाभले. बाल संस्कार शिबीराचे चांगले आयोजन करून यशस्वी केल्याने ग्रामस्थांनी शिक्षक संतोष सदगीर व लता जगधने यांचे अभिनंदन केले.