सोलापूर, सांगलीसह उस्मानाबादमध्ये अवकाळी पाऊस
सोलापूर, दि. 09 - राज्यात अवकाळी पावसाचा जोर सुरूच आहे. उस्मानाबादमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला आहे. तर तिकडे सोलापूर शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. जोरदार वार्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला. सांगलीतल्या कवठे महाकाळ तालुक्यात मळणगांव आण शिरढोण भागातही जोरदार पाऊस झाला.
पंढरपुरात वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे पेहे परिसरातील केळीची 1400 झाडं जमीनदोस्त झाली असून सुमारे 8 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. जिवापाड जपलेल्या बागा डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. शनिवारी झालेल्या या नुकसानीची प्रशासनाकडून अद्याप कोणतही दखल घेतली गेली नाही. त्यामुळं लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.