घंटानादाने पीएमपी प्रवाशांचे जनजागरण
पुणे, दि. 04 - चला स्मार्ट होऊया, पीएमपीने प्रवास करुया... सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करुया... स्मार्ट पीएमपी, स्मार्ट पुणे... प्रवाशांनो जागे व्हा... अशा घोषणा देत पीएमपी प्रवाशांचे जनजागरण करण्यात आले.
घंटानादाने पीएमपी प्रवाशांमध्ये जागृती करीत लोकसहभागातून पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी आणि हेल्पलाईलनचा जास्तीत जास्त वापर करून प्रवाशांनी पीएमपी सुधारणेमध्ये हातभार लावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पीएमपी प्रवासी मंचातर्फे पीएमपी प्रवासी जनजागरण अभियानांतर्गत पुणे महापालिकेच्या पीएमपी मुख्य बसथांब्यावर घंटानाद करून प्रवाशांमध्ये जागृती करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, प्रवासी मंचाचे सतिश चितळे, संजय शितोळे, अॅड. शिला परळीकर, अजित ठाकूर, नीळकंठ मांढरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक बसमध्ये जाऊन तसेच बसथांब्यावर माहितीपर पत्रकांचेही वाटप करण्यात आले.
विवेक वेलणकर म्हणाले की, पीएमपीची सक्षम व भरवशाच्या सेवा पुणेकरांना मिळावी. हे तुकाराम मुंढेंचे उद्दीष्टय आहे. जोपर्यंत प्रवाशांकडून त्याला प्रतिसाद येत नाही किंवा प्रत्यक्ष प्रवाशांच्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तोपर्यंत हे अशक्य आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी आणि प्रवाशांनी आपल्या अडचणी पीएमपीपर्यंत पोहोचवाव्या, याकरीता हेल्पलाईनचा वापर करावा, यासाठी प्रवासी जागर हा उत्तम पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले.