Breaking News

काश्मीरमधील अनधिकृत दूरचित्रवाणी वाहिन्या बंद करण्याचे वैंकय्या नायडू यांचे निर्देश

नवी दिल्ली, दि. 07 - जम्मू काश्मीरमध्ये दाखविल्या जात असलेल्या पाकिस्तानी तसेच संयुक्त अरब आमिरातीमधील अनधिकृत दूरचित्रवाणी वाहिन्या बंद  करण्याचे निर्देश माहिती तसेच प्रसारणमंत्री वैंकय्या नायडू यांनी जम्मू आणि काश्मीरच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. 
पाकिस्तानी आणि संयुक्त अरब आमिरातीमधील अनधिकृत दूरचित्रवाणी वाहिन्या बंद कराव्यात आणि याच्या अंमलबजावणी बाबतचा अहवाल लवकरात लवकर  पाठवावा, असेही नायडू यांनी सांगितले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, जे केबल चालक अनधिकृतपणे वाहिन्यांचे प्रसारण करत आहेत,  त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला असल्याचे माहिती तसेच प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी अलीकडेच सांगितले  होते. पाकिस्तानी आणि सौदी अरेबियाच्या वाहिन्यांकडून भारतविरोधी प्रचार केला जात असल्याचे दिसून आले आहे .