Breaking News

परकीय चलन साठा 372 अब्ज डॉलरवर

नवी दिल्ली, दि. 07 - देशाच्या परकीय चलन साठा 372 अब्ज डॉलरवर पोचला आहे, असे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीत म्हटले आहे. हा  आतापर्यंतचा उच्चांकी स्तर आहे. 28 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात 1.5 अब्ज डॉलरची वाढ होऊन चलन साठा 372 अब्ज डॉलरवर  पोचला.
मागील आठवड्यात परकीय चलन साठा 1.2 अब्ज डॉलर वाढून 371 अब्ज डॉलरवर पोचला होता. या आधी 30 सप्टेंबर 2016 रोजी चलन साठा 371 अब्ज  डॉलर या सर्वांधिक स्तरावर पोचला होता. साडेतीन वर्षांपूर्वी ऑगस्ट 2013 मध्ये मंदीच्या काळात चलन साठ्यात घट होऊन 274 अब्ज डॉलरवर पोचला होता.