5 रोजी कला शिक्षकांचा सातार्यात मोर्चा
सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) : माध्यमिक शाळांतील कला विषयाचे तास कमी केल्याने राज्यातील कला शिक्षक संतप्त झाले आहेत. शुक्रवारी दि. 5 रोजी जिल्ह्यातील कला शिक्षक शासन निर्णयाच्या निषेधार्थ मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्याची माहिती राज्य कला शिक्षक संघटना सातारा अध्यक्ष उमेश देशमुख व सहकार्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाचवीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कला हा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत एका कला शिक्षकाची नेमणूक केली आहे. पाचवीसाठी आठवड्यात सहा तासिका होत्या. मात्र आता त्या तीन केल्या आहेत, तर सहावी ते आठवीच्या वर्गाना चार तासिका होत्या त्या दोन केल्या आहेत. कला शिक्षकांच्या आठवड्याच्या तासिका कमी केल्या आहेत. त्याऐवजी त्यांना इतर विषय शिकविण्यास सांगितले जाणार आहे. वास्तविक कलेच्या तासिका कमी केल्यामुळे विद्यार्थ्यांना कला विषय शिकण्यास अडचणी येणार आहेत. कला शिक्षक इतर विषय किती तयारीने शिकविणार हा प्रश्न आहे. त्यांना इतर विषयाचे सखोल ज्ञान आहे का, याची विचार शासनाने केला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचेच दोन्ही बाजूने काही प्रमाणात नुकसान होणार आहे, असे मत कला शिक्षकांनी व्यक्त केले. दरम्यान जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांनी महाराजा सयाजीराव विद्यालय येथे शुक्रवार, दि. 5 रोजी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र कला शिक्षक संघटनेतर्फे केले आहे.