50 कोटी वृक्ष लागवडीकरीता लोकसहभागाचे आवाहन करणा-या चित्ररथाचा प्रवास सुरु
मुंबई, दि. 03 - गेल्या वर्षी 2 कोटी 83 लक्ष वृक्ष लागवडीमुळे गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नाव नोंदविण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेला आता 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठायचे आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मोहिमेला यावर्षी गतीशील व महाराष्ट्रव्यापी केले असून आज महाराष्ट्र दिनी चांदा ते बांदा जनजागृतीला निघालेल्या चित्ररथाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
राज्याच्या वन विभागातर्फे हा चित्ररथ महाराष्ट्र भ्रमण कर. चंद्रपूर येथून 1 मे रोजी या चित्ररथाचा प्रवास सुरु झाला. ग्रीन आर्मी (हरीत सेना) मध्ये सहभागी होण्याचे आणी वन व वन्य जीव यांच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन राज्यातील बहुतांश जिल्हयातून प्रवास करणा-या चित्ररथामार्फत केले जाणार आहे. या चित्ररथाला मोठा डिजीटल स्क्रीन असून त्यावर या मोहिमेचे महत्व विषद करणा-या विविध चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. 10 संगणकाची जोड देण्यात आलेल्या या चित्ररथाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे आवाहन करणारे प्रसिध्दी साहित्यही वाटप करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी 2 कोटीपेक्षा जास्त वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर 2017 मध्ये 4 कोटीचे, 2018 मध्ये 13 कोटी व 2019 या वर्षाकरीता 33 कोटीचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूण पुढील तीन वर्षात 50 कोटी वृक्ष संख्या महाराष्ट्रात वाढविण्याचा सुधीर मुनगंटीवार यांचा संकल्प आहे.
हा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी वृक्ष, वन व वन्यजीव यांच्यामध्ये आवड असणा-या नागरिकांचा सहभाग असणारी 1 कोटी जनतेची ग्रीन आर्मी बनवण्याचा वनमंत्री मुनगंटीवार यांचा संकल्प आहे. या चित्ररथाच्या महाराष्ट्र दौ-यात ही सदस्य नोंदणी होणार आहे.
हा चित्ररथ चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, परभणी, जालणा, बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग व सावंतवाडी असा प्रवास करणार आहे. महाराष्ट्रात या चित्ररथाचे ठिकठिकाणी स्वागत व्हावे व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सुरु झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे.