Breaking News

पाकमधील 47 विद्यार्थ्यांना परत पाठवले; परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली, दि. 04 - सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तात अधिक कठोर पावले उचलण्यास सुरू केली आहे. एका बिगर सरकारी संस्थेने एका कार्यक्रमासाठी 47 पाकिस्तानी विद्यार्थ्यांना भारतात बोलवले होते. मात्र अशा कार्यक्रमांसाठीची ही योग्य वेळ नसल्याने त्यांना परत पाठवण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी दिली.
उभय देशांमधील नागरिकांमध्ये सलोखा वाढावा म्हणून त्यांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांना भारतात बोलवले होते. 1 मे रोजी सुरू झालेल्या या विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रमात हे विद्यार्थी सहभागी झाले होते. मात्र त्यांना कार्यक्रम अर्धवट सोडून शिक्षकांसह परत लाहोरला पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.