Breaking News

युवराजने मैदानावर जिंकले सर्वांचे मन

नवी दिल्ली, दि. 04 - आयपीएल 10 मध्ये युवराज सिंह आपल्या खेळासोबतच आपल्या सौम्य व्यवहाराने सर्वांचेच मन जिंकतोय. याआधी कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याने रॉबिन उथप्पा आणि सिद्धार्थ कौल यांच्यात झालेला वाद सौम्यपणाने मध्यस्थी करत मिटवला होता. 
त्यानंतर काल झालेल्या सामन्यातही युवराजची खिलाडू वृत्तीने सार्‍यांचेच मन जिंकले. सामन्यात फिल्डिंग करत असताना युवा फलंदाज ऋषभ पंत फलंदाजी करत होता. यावेळी ऋषभच्या बुटांची लेस निघाली होती. त्यामुळे लेस बांधण्यासाठी त्याने मैदानावरील सहकार्‍यांना लेस बांधण्यासाठी इशारा करत होता. यावेळी युवराजने स्वत: जाऊन पंतच्या बुटांची लेस बांधली.