Breaking News

सहारनपूर हिंसाचाराप्रकरणी सोशल मिडीयावर अफवा; 33 जणांना अटक

सहारनपूर, दि. 12 - उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी झालेल्या हिंसाचाराबाबत सोशल मिडीयावर अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पी दोन आरोपींना आणि दंगल घडवून आणणाडिीयावर याप्रकरणी अफवा पसरवणा-यांवर प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. सद्यस्थितीत येथील वातावरण तणावपूर तरी येथे शांतता आहे.
येथील हिंसाचाराप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी दोन वरिष्ठ पोलीस अधीक्षकांचे निलंबन केले आहे. मंगळवारी येथे झालेल्या हिंसाचारात जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. यात दलितांनी पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार केला. या घटनेत 12 वाहने जळून खाक झाली.