इंजिनिअरिंग,फार्मसी सीईटी करिता नगर जिल्ह्यात 22 हजार विद्यार्थी
अहमदनगर, दि. 05 - 12 वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशा करिता 11 मे रोजी संयुक्त सामाईक परीक्षेचे (सीईटी)आयोजन करण्यात आले आहे.विद्याथ्र्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणार्या या परीक्षेसाठी अहमदनगर जिल्ह्या्तून सुमारे 22 हजार 56 विद्याथ्र्यांनी अर्ज दाखल केले आहेत.11 मे रोजी होणार्या या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने देखील जोरदार तयारी केली आहे.परीक्षेसाठी 2 हजार 61 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून परीक्षे केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्यांचा वॉच असणार आहे.
12 वी ची परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी सीईटी परीक्षेच्या तयारीत गुंतले आहेत.मेडिकल प्रवेशासाठीची नीट परीक्षा 7 मे रोजी होणार असून इंजिनिअरिंग व फार्मसी च्या प्रवेशा करिताची सीईटी परीक्षा 11 मे रोजी होणार आहे.बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय व इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची परीक्षा देत असतात.11 मे रोजी होणार्या सीईटी परीक्षेचे संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सीईटी परीक्षेसाठी 22 हजार 56 विद्याथ्र्यांनी अर्ज दाखल केले आहेत.त्यापैकी फक्त इंजिनिअरिंग साठी ची सीईटी देणार्या विद्याथ्र्यांची संख्या 3 हजार 192 इतकी आहे.फक्त फार्मसी ची सीईटी देणार्या विद्याथ्र्यांची संख्या 5 हजार 568 असून इंजिनिअरिंग व फार्मसी अशा दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा देणारे विद्यार्थी 13 हजार 296 इतके आहेत.विद्यार्थी संख्येनुसार नगर शहरात परीक्षा केंद्रांचे नियोजन केले जात असून परीक्षेच्या कामासाठी 68 केंद्र प्रमुख,68 सहाय्यक,224 पर्यवेक्षक,919 समावेशक, लिपीक,वाहनचालक,शिपाई असे एकूण 2 हजार 61 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार टाळण्याच्या हेतूने ज्या शाळा व महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहोत अशाच केंद्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने परीक्षेच्या काळात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.त्याबरोबरच 11 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत परीक्षा केंद्रांच्या परिसरातील एसटीडी बूथ,झेरॉक्स ची दुकाने,बंद ठेवण्याचा आदेश ही देण्यात आला आहे.