सामान्य माणसाला नजरेऊन काम करा-एकनाथ डवले
नाशिक, दि. 05 - प्रशासकीय यंत्रणेने संवेदनशीलतेने काम केल्यास यश निश्चितपणे मिळते. अशी संवेदनशीलता कायम ठेवीत सामान्य माणसाला नजरेसमोर ठेऊन काम करा, असे आवाहन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., अनिल कवडे, मल्लिनाथ कलशेट्टी, दिलीप पांढरपट्टे, अभय महाजन, किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर,ओमप्रकाश देशमुख, उपायुक्त डॉ.संजय कोलते, जया डवले, अर्चना कोलते, आदी उपस्थित होते.
नाशिकचे अनुभव सुखद असल्याचे नमूद करताना डवले म्हणाले, सामान्य माणसाप्रमाणे केलेली नाशिकमधील भटकंती कुंभमेळ्याचे नियोजन करताना उपयुक्त ठरली. कोणत्याही कामगिरीचा शेवट यशाने व्हावा या प्रामाणिक भावनेतून प्रसंगी कठोर भूमीक. प्रशासनातील शेवटच्या घटकापर्यंत चांगला संदेश जावा यासाठी वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला. अधिकार्यांनी माणूस म्हणून स्वत:चे मूळ संस्कार लक्षात ठेऊन काम केले तर प्रत्येकाला समान वागणूक आणि न्याय देणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. चांगले नेतृत्व देऊन संघभावना विकसीत करण्याचा प्रयत्न केल्यास चांगले काम करता येईल, असेही ते म्हणाले.
नाशिकने खुप स्नेह दिला असून या शहराची प्रेमाची ऊर्जा घेऊन मुंबईला चाललो, अशा शब्दात श्रीमती डवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विभागीय आयुक्त डवले यांना ‘प्रशासनातील संत’ अशी उपमा देताना जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, त्यांनी वैयक्तिक कामगिरीला महत्व न देता सर्व सहकार्यांची वाटचाल प्रभावी व्हावी यासाठी प्रयत्न केला.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन म्हणाले, डवले यांनी आपल्या कामाने इतरांसमोर आदर्श निर्माण करीत उत्तम नेतृत्व दिले. स्वभावातील साधेपणा आणि त्याला दिलेली तत्वाची सांगड यामुळे त्यांनी सर्वांच्या ह्थान मिळविले. ऊर्जादायी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले. यावेळी पांढरपट्टे, देशमुख, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, तलाठी संघटनेचे निलकंठ उगले, कर्मचारी संघटनेचे विठ्ठल मोराणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्या हस्ते साईबाबांची मुर्ती देऊन डवले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उपआयुक्त कोलते आणि जिल्हाधिकारी कवडे यांना निरोप देण्यात आला व त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महसूल विभागासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.