Breaking News

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

अहमदनगर, दि. 15 - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 126 जयंती जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नगरपालिकेत  जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी नगरपरिषदचे सर्व पदाधिकारी कर्मचारी मोठया संख्येने  उपस्थित होते.
यावेळी शहरातील समाजमंदिरात पंचायत समितीचे काळे   यांनी  बाबासाहेब  आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी  केंद्रप्र
मुख निळकंठ घायतडक. विकास  मंडळाचे  विश्‍वस्त गोकुळ  गायकवाड. शिक्षक सतिश सदाफुले,  उत्तम पवार,  सदाशिव भालेराव, अनिल गायकवाड,  अशोक घोडेस्वार,  भारतीय  बौध्द  महासभेचे  अध्यक्ष  रमेश सदाफुले. अध्यक्षा सुरेखाताई सदाफुले, सुरेखाताई   कोल्हे  आदी उपस्थित होते. यावेळी सिध्दार्थ नगर मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी  समाजबांधवांनी अभिवादन केले यावेळी सदाफुले वस्तीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी . समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी मिलिंद नगर येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी महेंद्र घायतडक सर. प्रभाकर सदाफुले सर अंकल घायतडक. अमोल सदाफुले. आण्णा घोडेस्वार. अशोक साळवे, अतिष पारवे. महेश सदाफुले.आदि समाजातील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.