Breaking News

मग्रारोहयो अंतर्गत 1 हजार विहीरीचे उद्दीष्ट वाढवण्याची मागणी

। पंचायत समितीच्या सभेत ठराव; शेतकर्‍यांचे स्थलांतर रोखण्यासाठीची उपाययोजना

अहमदनगर, दि. 15 - पाथर्डी तालुका हा डोंगराळ व दुष्काळी आहे.सिंचनाची कोणतीही  सुविधा तालुक्यात नाही. त्यातूनच उसतोडणी, कोळसा व मेैढपाळ या निमीत्ताने  तालुक्यातील जनतेचे मोठ्या प्रमानात स्थालांतर होते. स्थलांतर रोखून शाश्‍वत रोजगाराचा  प्रश्‍न सोडवीण्यासाठी अल्पभुधारक शेतकर्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतू सुमारे  एक हजार विहीरीचे उद्दीष्ट जिल्हाधिकार्‍यांकडून मिळण्याचा ठराव पंचायत समितीच्या मासीक सभेत करण्यात आला. 
पंचायत समितीच्या नवनिर्वाचीत सदस्याची सभा गुरुवारी गोपीनाथ मुंडे सभागृहात संपन्न  झाली. अध्यक्षस्थानी सभापती चंद्रकला खेडकर होत्या. यावेळी झालेल्या चर्चेत  जिल्हाधिकार्यांनी तालुक्यासाठी चारशे विहीरीचे उद्दीष्ट दिले आहे. तालुक्यात 107  ग्रामपंचायती व 137 गांवे असल्याने प्रत्येक गावात अवघ्या 3 विहीरी मंजुर होऊ शकतात.  राज्यात उसाचे क्षेत्र नसल्याने यावेळी तोडणी कामगार मोठ्या संख्येने गांवी थांबणार  आहेत. मजुरांना मजुरी मिळून शाश्‍वत रोजगार उपलब्ध होणार असल्याने जिल्हाधिकारी  यांचेकडून एक हजार विहीरीचे उद्दीष्ट मिळण्यासाठी आ. मोनिका राजळे यांच्या माध्यमातून  प्रयत्न करण्याचा ठराव पं.स. सदस्य सुभाष केकाण यांनी मांडला. सभेत पं.स.  कार्यालयातील कर्मचार्यांची वाढती अनुपस्थिती, बंद बायोमेट्रीक मशीन, अंगणवाडयातून  देण्यात येणारा निकृष्ठ आहार, प्राथमीक आरोग्य केंद्रातून रुग्णांची संख्या वाढवण्यासाठीचे  प्रयत्न व उपाय योजना याबाबत चर्चा झाली. वैयक्तीक लाभाचे असलेल्या वस्तुंचे वाटप  करण्याचे अधिकार सभापती व उपसभापती यांना देण्यात आले. उपसभापती विष्णूपंत अकोलकर म्हणाले की, कोणत्याही कर्मचार्यावर अन्याय होणार नाही. आ. मोनिका राजळे यांना अभिप्रेत असलेला पारदर्शी प्रशासनाचा कारभार केला जाईल. सर्व कर्मचारी, अधिकारी  यांचा सन्मान ठेवून विकास प्रक्रीया जोमाने पुढे घेवून जाण्याचे प्रयत्न केले जातील. सभापती चंद्रकला खेडकर यांनी तालुका स्वच्छ भारत अभियानातंर्गत घेवून सर्व सदस्य आपला गण हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतील असे सांगीतले. सर्व खातेप्रमुखांनी आपल्या कामकाजाची माहीती यावेळी सभागृहात दिली. यावेळी गटनेते सुनिल ओव्हळ, सुनिल परदेशी, राहुल गवळी, सुनिता दौंड, शिला खेडकर, गंगुबाई हाटकर, यांनी कामकाजात सहभाग घेवून विविध विषयावर चर्चा केली. तर गटविकास अधिकारी अरुण  हरीश्‍चंद्रे, सहाय्य्क गटविकास अधिकारी आर.एस. सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी जगदीश पालवे, उपअभियंता आर.एस. फुंदे, तालुका आरोग्य अधिकारी नारायण  वायभासे, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती गावीत, विस्तार अधिकारी डी.के.  गुरगुडे, उपस्थित होते.