Breaking News

ऐन गर्दीच्या हंगामात पाथर्डी आगाराचा ढिसाळ कारभार

अहमदनगर, दि. 15 - ऐन गर्दीच्या हंगामात पाथर्डी आगाराचा कारभार पूर्णपणे ढासळला असून लांब पल्ल्याच्या  रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे . नगर हुन सायंकाळी पाच ते रात्री नऊ च्या दरम्यान गाडयाचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे खुप हाल होतात नगर पाथर्डी नगर या मार्गावरील सर्वाधिक फायदयाची विनाथांबा बससेवा अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनमानी पणामुळे अखेरच्या घटका मोजत आहेत उन्हाळी हंगामासाठी जादा गाडया सोडण्याऐवजी पुणे मार्गावरील गाडया बंद करून कर्मचार्‍यांची सोय पाहिली जाते आगाराला कुणी वाली उरला नसल्याने कोणत्याही क्षणी प्रवाशांचा उद्रेक होउन परिस्थीती अशांत बनवू शकते एवढी दुरावस्था  वगैर सोय होत आहे विभाग नियंत्रकांनी जातीने लक्ष घालण्याची प्रवशांची मागणी आहे.