Breaking News

अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली, दि. 03 - अनुदानित गॅस सिलेंडरच्या (एलपीजी) दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात 5.57 रुपये वाढ झाली आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर (एलपीजी) 14.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
दरम्यान, याबरोबरच विमान इंधन (एटीएफ)च्या दरामध्ये देखील जवळजवळ पाच टक्के कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. याआधी एक मार्च आणि एक फेब्रुवारीला विमान इंधनात वाढ करण्यात आली होती. मात्र, आता पाच टक्के घट करण्यात आल्यानं विमान प्रवास स्वस्त होणार आहे.