Breaking News

कर्जतमधील महिलांनी साजरी केली डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

अहमदनगर, दि. 15 - मिरजगांव ग्रामपंचायतच्या  सफाई कामगार महीला एकत्र येवुन त्याच्या स्वखर्चातुन 126 वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. मिरजगांव येथिल क्रांती चौकात आकषर्र्क सजवलेल्या स्टेजवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आकर्षक असा अर्ध पुतळा बसवण्यात आला. यावेळी सफाई कर्मचारी वच्छला घोडके, आरती डोलारे, शालन क्षिरसागर, कांचन रोकडे, नंदा घोडके,किसनाबाई हिवाळे, मंदा सकट,नंदा सकट, कांताबाई घोडके, मोहना चव्हाण, शिला चव्हाण, अंकीता घोडके यांनी डॉ. आंबेडकरांच्या अर्ध पुतळयास पुष्पहार घालुन अभिवादन केले. प्रथमच ग्रामिण भागात महीला एकत्र येवुन असा कार्यक्रम करण्याची पहीलीच वेळ आसल्याने ग्रामस्थ मोठया उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहात होते. परंतु मनात कसलाही विचार न आणता एका चांगल्या कामास सुरूवात केल्याचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. महीलांनी आयोजित केलेल्या जयंती उत्सव कार्यक्रमात मिरजगांवचे सरपंच नितिन खेतमाळस, उपसरपंच अमृत लिंगडे, ग्रामसेवक विजयकुमार बनाते, जि.प.सदस्य गुलाबराव तनपुरे, माजी जि.प. सदस्य परमविर पांडुळे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे, कर्जत पं.समिती उपसभापती प्रशांत बुध्दीवंत, माजी सरपंच सारंग घोडेस्वार, दादा बुध्दीवंत,भाजपा शहराध्यक्ष कैलास बोराडे, ग्रा.पं.सदस्य संपतराव बावडकर, लहुजी वतारे, अनिल ष्यंबके यांचे सह ग्रामस्थ व येथिल भिम सैनिकांनी मोठया संख्येने सहभागी होवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास पुष्पहार घालुन अभिवादन केले. यावेळी सुगंधी घोडके व कुलदीप गंगावणे यांनी सामुहीक बौध्द वंदना घेतली या विधीमध्ये सर्व मान्यवर सहभागी झाले.   या सर्व कामगार महीलांनी सहभाग घेवुन जयंती साजरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांना सुभेच्छा दिल्या व असेच सामाजिक कार्यक्रम राबवुन समाजाला चांगला संदेष देण्याचे काम करण्यास आम्ही तुम्हाला सहकार्य करू असे म्हणाले.आत दि.14 एप्रिल रोजी मिरजगांव ग्रामपंचाय कार्यालय ,तसेच भारत विदयालय मिरजगांव, सदगुरू कृशी महाविदयालय,जिल्हा परिशद प्रा. षाळा तसेच येथील बौध्द विहार मध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम करण्यात आले.