Breaking News

पाथर्डीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन

अहमदनगर, दि. 15 - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम शहरातील आंबेडकर भवनासमोर झाला.जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले,भाजपचे तालुकाध्यक्ष  माणिक खेडकर,नगराध्यक्ष डॉ.मृत्यूजय गर्जे,आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड व श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सायंकाळी शहरातून आंबेडकरांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.श्री तिलोक जैन विद्यालयाने भीमा तुझ्या जन्मामुळे हा भीमगीतांचा संगीत रजनीचा कार्यक्रम लक्षवेधी ठरला.अभिवादन सोहळ्याचे धार्मिक विधी धम्मवंदना व प्रार्थना भंते प्रेमानंदची व त्यांच्या शिष्यांनी सादर केले.उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, वसंत बोर्डे, रवींद्र आरोळे, इन्द्रजित शिंदे, बाबा राजगुरू, वाल्मिक नरवडे, नाना पगारे, दिपक कांबळे,अशोक शिरसिम, आदींसह विविध नगरसेवक उपस्थित होते.पागोरी पिंपळगाव येथे अलका नांगरे व उपसरपंच राजेंद्र बोरुडे व सर्व ग्रामपंचायत  सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा संपन्न झाली.