Breaking News

शेती उत्पन्नाला लवकरच इनकम टॅक्स?

नवी दिल्ली, दि. 26 - निती आयोगाने पंधरा वर्षाचा रोड मॅप सादर केला आहे, यात शेतीला इनकम टॅक्सच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न आहे. निती आयोग शेतीवर इनकम टॅक्स लावण्याच्या बाजूने आहे. सरकार लवकरच यावर निर्णय घेणार आहे.
निती आयोगाचे सदस्य विवके देबरॉय यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे, विवेक देबरॉय म्हणाले, शेतीवर असलेल्या उत्पन्नाला इनकम टॅक्स लागला पाहिजे.
यात सामान्य माणसाला जेवढा टॅक्स लागतो, तेवढा शेतकर्‍याला लावला जाणार आहे. शहरी लोकांना ज्या उत्पन्नावर टॅक्स लागतो, तेवढाच शेतकर्‍यांना लावला पाहिजे असेही विवेक देबरॉय यांनी म्हटलं आहे. अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या ग्रामीण भागातील लोकांना इनकम टॅक्स खाली आणलं जाणार आहे,
देशात 22.5 कोटी परिवार आहे, त्यातील जवळ-जवळ दोन-तृतीअंश ग्रामीण भागात राहतात.
ग्रामीण भागातील नागरिक आयकरच्या चौकटीबाहेर आहेत, कारण तेथील प्रमुख उत्पन्न शेतीवर आधारीत आहे. दुसरीकडे शहरात राहणार्‍या 7.5 कोटी लोकांवर आयकर लावला जावू शकतो. एकूण 3.75 कोटी ते 4.5 कोटी कुटुंब असे आहेत, जे इनकम टॅक्सच्या चौकटीत येतात.