Breaking News

नवी मुंबईत राजीनामा नाट्यानंतरही विजय चौगुले स्थायी समितीवर

नवी मुंबर्ई, दि. 26 - पालिका स्थायी समिती सदस्य निवड जाहीर करण्यात आली आहे. सभागृहात महापौर  यांनी नाव पुकारून नेमणूक केली. शिवसेनेकडून पुन्हा विजय चौगुले यांच्यावर मेहर नजर दाखविण्यात आली आहे. विजय चौगुले यांची स्थायी समिती सदस्य पदी वर्णी लागली आहे. 
विजय चौगुले यांनी संधी देऊ नये म्हणून शिवसेनेतून वाढता विरोध होता. एकाच व्यक्तीला अनेक पदे कशासाठी, असे सांगत शिवसेनेच्या 20 नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाकडे राजीनामे सादर केले होते. मात्र, मातोश्रीकडून विजय चौगुले यांच्या नावाला पसंती देण्यात आली. पक्षाने कोणत्याही दबावाला बळी न पडता विजय चौगुले यांनाच संधी दिली.