Breaking News

इंजिनिअरिंग सीईटी तूर्तास स्थगित

नवी दिल्ली, दि. 29 - देशभरातील इंजिनिअरिंगची सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात कॉमन एण्ट्रस एक्झाम (सीईटी) स्थगित करण्यात आली आहे.  मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सर्व राज्यांचं एकमत होत नाही तोवर इंजिनिअरिंग सीईटी स्थगित ठेवण्यात आली आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एजुकेशन येत्या शैक्षणिक वर्ष 2018 पासून देशभरात इंजिनिअरिंगसाठी एकच सीईटी होईल, अशी घोषणा मार्च महिन्यातच केली होती. मात्र पश्‍चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने त्याला विरोध केला आहे. त्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय तूर्तास थांबवला आहे. देशभरात इंजिनिअरिंगची एकच प्रवेश परीक्षा असावी, याबाबत सर्व राज्यांचं एकमत होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सध्या हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे, असं एका अधिकार्‍याने सांगितलं. याप्रकरणी सर्व राज्यांशी चर्चा आणि सल्ला मसलत होणं आवश्यक आहे, असंही या अधिकार्‍याने सांगितले.