महापौर मुक्ता टिळक यांच्या वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात
पुणे, दि. 30 - पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांनी (शुक्रवारी) नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना देशातील आरक्षणामुळे ब्राम्हण समाजातील मुले परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे आणि तेथेच स्थायिक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या कुशाग्र बुद्धीमत्तेला मायदेशी परत आणण्याची तसेच त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे वक्तव्य केले होते.
या वक्तव्याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात होत आहे. याविषयी संभाजी ब्रिगेडचे पुणे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी एका मेसेजद्वारे मुक्ता टिळक यांनी या वक्तव्यातून आरक्षणाला छुपा विरोध केल्याचे म्हटले आहे. हाच संघाचा अजेंडा आहे.
बाळ गंगाधर टिळकांच्या मनातील ’सल’ आज महापौर मुक्ता टिळक यांनी बोलून दाखवली...! सर्वच मुले परदेशात जातात. त्यात नवल काय...? शेवटी महापौर जातीवर आल्या...! महापौर टिळक यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या बाबत... सर्व समाजाची माफी मागितलीच पाहिजे.
युक्रांदचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांनीही महापौरांच्या वक्तव्याचा निषेध करत विकासाच्या मुद्यावरून लक्ष भरकवटवण्याचा हा प्रकार असल्याचे म्हंटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यावक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज दुपारी 4 वाजता महापौरांच्या केसरी वाड़ा नारायण पेठ या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्षा वंदना चव्हान यांनी सांगितले.