नाशिकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पिकांचं मोठं नुकसान
नाशिक, दि. 30 - सटाणा तालुक्यातील अनेक गावात आज दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तसंच काही भागात गारपीटही झाली आहे. आज दुपारी अंबासन आणि आसखेड़ा या गावात गारपीट झाली आहे. त्यामुळे अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने डाळिंब, कांदा पिकांचंही नुकसान झाले आहेसटाणा तालुक्यातील नामपूर परिसराला आज रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गारपीट, वादळी वार्यासह जोरदार पावसाने झोडपलं. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. वादळी वारा व गारपिटीमुळे परिसरातील कांदा, गहू, डाळींब, कांदा बियाणांचे मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसाचा शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाचा तडाखा इतका जबरदस्त होता की, काही क्षणातच अक्षरश: गाऱांचा खच रस्त्यावर पडला होता.
