महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पदभार स्वीकारला
पुणे, दि. 30 - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नुतन आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर यांनी (गुरूवार) सकाळी पदभार स्वीकारला. माजी आयुक्त दिनेश वाघमारे यांची राज्य सरकारने पदोन्नतीवर बदली केल्यानंतर आयुक्तपदी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
श्रावण हर्डीकर हे 2005 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. हर्डीकर यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून आपली कारकिर्द गाजवली होती. प्रशासकीय निर्णयात राजकारण्यांचा हस्तक्षेप खपवून न घेतल्याने त्यांनी काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा रोष ओढवून घेतला होता. त्यातूनच काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रावण हर्डीकर यांची नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून तडकाफडकी बदली केली होती. त्यावेळी माणिकराव ठाकरे यांनी सूडाचे राजकारण केल्याची टिका विरोधकांकडून झाली होती.