। बसस्थानकाजवळील हॉटेलजवळ पोलिसांचा छापा
अहमदनगर, दि. 09 - शहरातील हॉटेल कैलास जवळ अवैद्य रित्या दारू विकणार्या एका इसमाला पोलिसांनी छापा टाकून दारूसह अटक केली . शुक्रवारी सायंकाळी गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली कि ,जुन्या बस्थानका मागे असलेल्या कैलास हॉटेल जवळ अवैद्य रित्या दारूची विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे . त्यानंतर पोलिसांनी खातर जमा करून छापा टाकला या छाप्यात शहाराम बालवे वय 48 या आरोपीला पोलिसांनी अटक केली . यांच्याकडून चौकशी केली असता त्याने हॉटेल कैलासच्या लॉजिंगच्या एका खोलीत सुमारे एक लाखाची देशी विदेशी दारू ठेवली होती . पोलिसांनी ती दारू जप्त करून बालवेला अटक केली दारूसह एक लाख चौसष्ठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे त्यात दारूच्याबाटल्या मोटारसायकल,मोबाईल असा मुद्देमाल आहे . पोलिसांनी दारूच्या बाटलीची पाहणी केली असता त्यावर सन 2010 ,2...?,, चे उत्पादन केल्याचे निदर्शनास आले असून जुनी दारू विकल्या जाईची यावरून स्पष्ट झाले आहे .जुनी दारू विकून लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे नाकारता येत नसून त्यानुसार प्रयोग शाळेकडे सदरच्या दारूची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिली. या दारू छापा कारवाईसाठी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार ,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे ,पोलीस कर्मचारी सचिन शिंदे ,भगवान सानप ,संभाजी शेंडे ,नय्यूम पठाण ,विजय कोळी ,राजू पुंड ,सोमनाथ सुपारे ,विश्वास बोर्डे ,भगवान पालवे ,सोमनाथ घुगे,किशोर लाड यांनी कारवाई केली. पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तापस प्रशिक्षनार्थी पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.