पिंपरी जलसेन मध्ये खंडोबा मंदिर ते यमाई मंदिर पाईपलाईनचे उद्घाटन
अहमदनगर, दि. 09 - पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील ग्रामपंचायतच्या 14 व्या वित्त आयोगातून कदम माळयातील 1 लाख 20 हजार रुपये खर्चाच्या खंडोबा मंदिर ते यमाई मंदिर या पिण्याच्या पाईपलाइन चे उद्घाटन नुकतेच झाले असुन कामही सुरु करण्यात आले आहे.
ग्र्रामपंचायतच्या 14 व्या वित्त आयोगातून नुकतेच थोरात मळा येथे 297127 रुपये खर्चाच्या पिण्याच्या पाईप लाईनचे काम करण्यात पूर्ण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ लगेचच कदम वस्तीवरिल खंडोबा मंदिर ते यमाई मंदिर या एक लाख विस हजार रुपये खर्चाच्या पिण्याच्या पाईप लाईनचे काम सुरु आहे. त्याबरोबरच रोजगार हमीच्या कुशल कामांच्या अंतर्गत ठिकठिकाणी रस्त्यावर सीमेंट पाईप टाकन्याचे काम सुरु असल्याचे यावेळी उपसरपंच संदीप काळे यांनी सांगितले. सध्या सुरु असलेल्या पिण्याच्या पाईपलाइनच्या कामामुळे पाण्याचा होणार अपव्यय टळनार असुन ग्रामस्थांना पूर्ण दबाने पिण्याचे पानी मिळणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य विजय चत्तर यांनी सांगितले. या पाईप लाइन च्या उद्घाटनप्रसंगी , उपसरपंच संदीप काळे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत अडसरे,ताराचंद बोरुडे, ग्रामसेवक प्रशांत भिसे, गजानन कदम, लक्ष्मण बोरुडे आदींसह कदम माळयातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.